Ad will apear here
Next
‘केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा’


सोलापूर : ‘केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या विकासास गतिमान करावे आणि या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी कार्यरत राहावे,’ असे आवाहन खासदार तथा जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी येथे केले.

मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी समितीचे सदस्य आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत भालके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे, ‘डीआरडीए’चे प्रकल्प संचालक अनिल नवाळे आदी उपस्थित होते.

खासदार मोहिते-पाटील म्हणाले, ‘ग्रामीण आणि शहरी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी योग्य आराखडे, प्रस्ताव सादर करणे त्यांना मंजुरी घेणे या बाबींवर संबंधित यंत्रणांनी भर द्यावा’

आमदार देशमुख आणि आमदर भालके यांनीही सूचना मांडल्या. या वेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, भूमि अभिलेख संगणकीकरण, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्मार्ट सिटी अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उज्ज्वल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, कौशल्य विकास योजनांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीला उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZVKBP
Similar Posts
‘दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची ताकद मिळावी’ पंढरपूर : ‘राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून, शेतकरी आणि त्याच्या पशुधनाला दिलासा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ताकद मिळावी, असा आशीर्वाद पांडुरंगाकडे मागितला आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा सोलापूर : ‘झाडू संताचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग’ या संत वचनाप्रमाणे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर १६ जुलै रोजी सोलापूर जिल्हा प्रशासनाने पंढरपुरात राबविलेल्या महास्वच्छता अभियानात एकाच दिवसात सुमारे १४ टन कचरा गोळा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या अभियानात
अकलूजमध्ये ‘संवाद वारी’ सोलापूर : ‘राज्य शासनाने शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या योजनांची माहिती प्रामुख्याने संवाद वारी प्रदर्शनात दिली आहे. संवाद वारी शासकीय योजनांचा अतिशय चांगला उपक्रम असून, वारकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अकलूज (ता. माळशिरस) येथे केले.
‘जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना गती द्यावी’ सोलापूर : ‘येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पालखीमार्ग, तसेच जिल्ह्यातील इतर रस्त्यांच्या कामांना गती द्यावी,’ अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांना केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language